•जान्हवी पांडे, हिमानी चचडा व हर्षा ठमके ठरले तालुक्याचे मानकरी….!
अजय कंडेवार, वणी :– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला त्यात वणी तालुक्यातून 2 हजार 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातूनही जान्हवी पांडे, हिमानी चचडा व हर्षा ठमके या तिघीही तालुक्याचे मानकरी ठरले.This year too girls are at the top position.Janhvi Pandey, Himani Chachda and Harsha Thamke became the taluk leaders….!
वणी तालुक्यातील पाच शाळांचा निकाल 100 टक्के असून एका शाळेचा निकाल सर्वात कमी 20 टक्के लागला आहे .वणी तालुक्यातून लायन्स इंग्लिश मिडीयम शाळेची जान्हवी संजय पांडे हिला 95.60 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला, वणी पब्लिक स्कुलची विद्यर्थिनी हिमानी निलेश चचडा हिला 95.40 टक्के गुण घेऊन दुसरी तर जनता विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षा विनोद ठमके हिला 95.20 टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे.एस.पी एम. शाळेचा वणी 84.58 टक्के, आदर्श विद्यालयाचा 64.38टक्के तर जनता शाळेचा वणी 89.20 निकाल लागला आहे.