•विज्ञान शाखेचा निकाल १००% ; बहुतांश विद्यार्थी प्राविण्यप्राप्त
विदर्भ डेस्क,वणी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२२-२३ चा निकाल आज (दि. २५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.Even this year, the history of success with “Janata Career Launcher” is intact..100% result in science stream; Most students graduate
जनता करिअर लॉन्चरमधून साहिल मंडलवार, नीलय खंगार, ओम गुरू, ओम चलाख, पुनम जुमडे, सोहम पारखी, ईशा राऊत, सानिका पाढाल, श्रेयस निकेसर, ओम मुथावार, तुषार उरवटे हे आदी विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.यामधे ८०% पेक्षा अधिक गुण घेणारे बहुतांश विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य के. ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, प्रा. व्ही.एस.बोढाले, डॉ. ए.के.महातळे, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. संजय पवार, प्रा. जी. बी. दर्वे, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.