• खेळाडूचा सहभाग; अनेक हाऊसने पटकविले बक्षीसे
अजय कंडेवार,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी स्कूल (सी.बी.एस.ई.) मध्ये पाच दिवसीय लक्ष्य-2022-23 हा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे ब्लू, रेड, येलो व ग्रीन अशा चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते. यात सर्व हाऊसने अनेक बक्षीसे पटकाविला अश्या प्रकारे शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून एमएसपीएम् ग्रूपचे संचालक पि.एस आंबटकर व शाळेचे मुख्यद्यापक श्रीमती शोभना मॅडम होत्या.क्रीडा महोत्सव मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत तसेच मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन, मानवंदना केले. तसेच पाहुण्यानी मशाल पेटवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले . श्रद्धा समर्थ आणि दिशा थाटे यांनी अतिथींचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेले एमएसपीएम् ग्रूपचे संचालक पि.एस आंबटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितलेच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळांचे महत्त्व देखील पटवून दिले. शाळेचे मुख्यद्यापक श्रीमती शोभना मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व सांगितले. निरोगी रहा व शाळेतील राज्य, जिल्हा, विभाग पातळीवर कसे पोहोचाल याबाबत विशेष मार्गदर्शन केले तसेच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र दिला.
वर्ग नर्सरी ते वर्ग दहावी चे विद्यार्थि सहभागी झाले. क्रीडा स्पर्धेच्या वयोगटानुसार विभाजन करून स्पर्धा घेण्यात आल्या . मैदानी खेळ १००/२००मीटर धावणे , लांब उडी , उंच उडी , थाळी फेक , गोळा फेक , रीले , अडथळा शर्यत . स्किपिंग सांघिक खेळ कबड्डी , खोखो , क्रिकेट , फुटबॉल , व्हॉलीबॉल , बास्केटबॉल , बुद्धिबळ,लिंबू चमचा, वॉक रेस, रनिंग रेस, बॅलन्स बुक, होपिंग रेस, टनल रेस, बॉल इन द बास्केट रेस, लॉग जंप, पॅरामिड ग्लास, लंगडी, ओवर आर्म या खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत सर्व प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले .सर्व स्पर्धा वयोगटानुसार घेण्यात आली . प्रत्येक वयोगटतील पहिला दुसरा तिसरा स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि ब्राँझ सिल्वर , गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल केराम व अर्शदिप सिंघ केले . तर शारीरिक शिक्षक सुधीर लडके, यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफिसियल नितेश कूरेकार , सुत्रावे ,अश्विनी मिश्रा खेळाचे पंच म्हणून आकिब शेख, राजीव घुगुल, राहुल बावणे, सुनील तिखट, संजय सिंह व निखिल घाटे यांनी काम केले . शाळेच्या शिक्षका संगीता पवार, रुपाली, सोनी ,अर्चना, सपना ,अजय कंडेवार,एकता, वृषाली, प्रिया, शितल, मीनाक्षी ,मोना पाईकराव यांनी विद्यार्थी दक्षता कार्य केले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील परिश्रम केलें.