•विद्यार्थ्यांनी समूहनृत्य व समूहगीताने सर्वांची मने जिंकली
अजय कंडेवार,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, वडगांव येथे 26 जानेवारी 2023 गुरूवार रोजी शाळेत 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रथमतः सकाळी 7.40 मिनिटांनी एमएसपीएम् संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांच्या विशेष उपस्थितीत त्यांचा शुभहस्ते ध्वजारोहण करीत भारत मातेचे पूजन तसेच विविध कार्यक्रमानी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
इ.8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सुधीर लडके व सोनी कुरील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट पथसंचलन व कवायती करून उपस्थितांना मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते के जी 1 एक गट, दुसरा के. जी 2 ते पहिली व तिसऱ्या गटात माञ पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य व समूहगीताने सर्वांची मने जिंकली. लेझिम प्रदर्शनाचा माध्यमातून भारताचा नकाशा बनवुन पालकांचे मनच हिरावून घेतले तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यानी मनोगत देखील व्यक्त केले.
विशेषतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष एमएसपीएम् संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित सर्व भारतीयांना तसेच उपस्थित पालकवर्ग व विद्यार्थांना शुभेच्छा देत आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने समता व बंधुत्वाची जपणूक करावी असे आवाहन करत आजच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शासनाच्या विविध परीक्षेत सहभागी होत सदैव उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जेणेकरून ग्रामीण भागातील सामन्य कुटूंबातील विद्यार्थी देखील उच्च अधिकारी याच शाळेतील बनू शकेल असे मनोगत केले..
तसेच प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित शाळेचे मुख्याध्यापिका तसेच सिंघम ऑफ लेडी म्हणून परिचित असलेले शोभना मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की,” या मोबाइल आणि टीव्ही नावाच्या राक्षसांनी आपली सगळी मेहनत, मुलांमध्ये आपण पाहिलेली सगळी स्वप्न क्षणात उद्धवस्त होत आहे.एकदा गेलेला निरागसपणा कधीच वापस येणार नाही, त्यामुळे एक पालक म्हणून आपण वेळीच सावध होऊन त्यांच्या निरागस पणा कुणी हिरावून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी, यासाठी आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं खूप गरजेचं आहे, मुलांच्या हातात मोबाइल द्या पण त्यात त्यांनी काय पाहावं हे आपल्या हातात राहू द्या, त्यांचे मित्र कोण आहेत, ते आपण नसताना काय गप्पा मारतात, न कळत आपलं लक्ष असावं, शक्य तेवढा वेळ आपणच आपल्या मुलांना आई-वडील यांनी आळीपाळीने दिला तर नक्कीच आपली मुलं या संकटात आले आहे. म्हणून पालकांनी त्यांचा सोबत वेळ घालवणं, खूप गरजेचं आहे, मुलांच्या हातात मोबाइल द्या पण त्यात त्यांनी काय पाहावं हे आपल्या हातात राहू द्या, त्यांचे मित्र कोण आहेत, ते आपण नसताना काय गप्पा मारतात, न कळत आपलं लक्ष असावं, शक्य तेवढा वेळ आपणच आपल्या मुलांना आई-वडील यांनी आळीपाळीने दिला तर नक्कीच आपली मुलं या संकटात कधीच सापडणार नाहीत. आपली खरी संपत्ती म्हणजेच आपली मुलं मग त्या संपत्तीच रक्षण करणं ही तेवढंच गरजेचं आहे…… प्रत्येक पालकांनी नक्कीच विचार ‘आज विचार करावा’ म्हणजे तुमच्या मुलांसह तुमचा ‘उद्याचा ‘दिवस’ यशाचा असणार आहे.. हेच शिस्त प्रजासत्ताक दिवशी लागावी हाच माझा भाषणाचा मुख्य हेतू आहे.”
याप्रसंगी सूत्रसंचालन गुलशन खान व नुरशिल शेख यांनी केले. तर या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आयटीआय चे मुख्यद्यापक संजय दामले , समस्त पालक, विद्यार्थी , शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.