•चिमुकल्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया.
अजय कंडेवार,वणी :- आपण लोकशाही देशाचा एक भाग आहोत आणि याच लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देखील आहे. हाच विचार बाळगत चिमुकल्यांनाही निवडणुकीचा अनुभव यावा याकरिता एक उपक्रमाचा स्वरूपात शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ‘सिटी ब्रांच’ च्या आवारात “हेड बॉय आणि हेड गर्ल” या पदासाठी निवडणूक घेण्यात यावे याकरिता संस्थेचे उपसंचालक पियूष आंबटकर यांचा आदेशाने मॅकरून सिटी ब्रांच चा मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय निवडणूक दि.19 जुलै बुधवार रोजी अत्यंत आनंददायी वातावरणात घेण्यात आली.Macaroon City Branch’s school heroes ‘Gagan Batra and Iswari Samarth.Election process experienced by toddlers.
या शालेय निवडणूकीत हेड बॉय या पदाकरीता 3 उमेदवार तर हेड गर्ल करीता 3 असे एकूण 6 पात्र विद्यार्थी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती.त्यानंतर अंतिम उमेदवारांनी वर्ग 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्याना संबोधित केले आणि त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली.विद्यार्थ्यांना प्रचार माध्यमासाठी 2 दिवस देण्यात आले.यात वादविवाद, जाहीरनामा, रंगीबेरंगी मतपेट्या, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणे अशी दीर्घ प्रक्रिया सुरळीत पार पडली.या घेण्यात आलेल्या मतदानातून हेड बॉय म्हणून नमन गगन बत्रा तर हेड गर्ल – ईश्वरी सुरेंद्र समर्थ हे या निवडणुकीत विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तसेच व्हाईस हेड बॉय -युगांत प्रशांत नक्षीने तर वाईस हेड गर्ल -क्रितिका नितेश कुरेकर या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. विशेषता प्रत्येक हाऊस लिडर ची ही निवड करण्यात आली त्यात ग्रीन हाऊस लिडर-माही अक्षय खडतकर ,आमिर फारुक शेख ,ब्लू हाऊस लीडर – अनया सचिन देशमुख,माविया इफ्तारखार शेख,येलो हाऊस लीडर -युवराज विनोद ढोले,समृद्धी संतोष दामोदर तर रेड हाऊस लीडर – अनवी सुरेंद्र पावडे, समर विवेक चंदनकर यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी मॅकरून सिटी ब्रांच य शाळेचे मुख्यद्यापिकाअश्विनी ढोले ,समस्त शिक्षकवृदं व समस्त विद्यार्थी उपस्थित होते. या निवडणूक कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता समस्त शिक्षकांनी सहकार्य केले .