Ajay Kandewar,Wani:- स्रियांसाठी शिक्षणाची दारं उघडून ज्ञानाची गंगोत्री निर्मिती करणाऱ्या थोर समाजसुधारक,स्री क्रांतिकारक स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती “सावित्रीबाई फुले” यांची 195 वी जयंती तालुक्यांतील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी.एस .ई शाळेत उत्साहात पार पडली.विशेष म्हणजे वर्ग 2 री ची विद्यार्थीनी कु .प्रांजली प्रवीण देठे हिने सावित्रीबाईंचा हुबेहूब पेहराव करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचा मुख्यद्यापीका शोभना होत्या तर कार्यक्रमाची सुरुवात मुख्यद्यापीका शोभना यांचा हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आलें. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्री शिक्षणासाठी तसेच अज्ञान व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण म्हणून विद्या स्वप्नील पाटील या शिक्षिकेने मनोगत व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुले यांचा जीवनपटावर अधिक प्रकाश टाकला. यावेळी समस्त विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर उपस्थित होतें.