Thursday, December 4, 2025
Homeवणी' मॅकरून शाळेत ' संविधान दिन उत्साहात......

‘ मॅकरून शाळेत ‘ संविधान दिन उत्साहात……

•’सिटी ब्रांच मॅकरून’ मध्येही चिमुकल्यांनी केले संविधान प्रास्ताविकेचे वाचन.

अजय कंडेवार,वणी :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी या सीबीएसई शाळेत दि . २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन ‘ वडगाव मेन ब्रांच व हार्ट ऑफ द सिटीत असलेले ‘मॅकरून सिटी ब्रांच ‘ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेचे मुख्यद्यापिका शोभना मॅडम यांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संविधान दिन व संविधानाविषयी सविस्तर माहिती दहावीचा विद्यार्थ्यानी दिली व सामुहीक संविधान वाचण्यात आले आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments