Ajay Kandewar,वणी :- तालुक्यातील मॅकरुन स्टुडंट्स अकॅडमी (सी.बी.एस.ई.) शाळेचा मुख्यद्यापिक शोभना यांचा विशेष उपस्थितीत दि.24 डिसें रोजी “नाताळ” सण उत्साहात साजरा करण्यात आला.
पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजची वेशभूषा धारण करून जिंगल बेल या गाण्यावर थोडेफार नृत्य सादर केले. त्यानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मोलाचा संदेश दिला. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील काहींनी मदर मेरी,मेंडपाल,परी असे विविध वेशभूषा धारण करून प्रभू येशूच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशी वेशभूषा सादर केली. विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन “हॅप्पी ख्रिसमस डे “च्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापिका शोभना यांनी नाताळ विषयी व प्रभू येशूचा महिमा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच वर्ग दुसऱ्या व चौथीचा विद्यार्थांनी नाताळ विषयीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.जिंगलबेल, जिंगलबेल’ या गीतावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशनची मजा लुटली. शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ‘राष्ट्रगान ‘म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

