•ग्रामपंचायतने अभियंत्याला घातले निवेदनाद्वारे साकडे.
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील शिंदोला सबस्टेशन अंतर्गत गोवारी फिडर मधील येणारी 11 kv लाईन परिसरातील मेंटेनन्स व ट्री-कटिंगचे कामे करण्याकरीता ग्रामपंचायतेचा आढावा सभेतही कटिंग व मेंटेनन्स बाबत सूचना केली होती मात्र अद्यापही या मुजोर महावितरण कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केल्याने अपघाताची दाट शक्यता वाढली आहे त्याकरिता ग्रामपंचायत ढाकोरीचे सरपंच अजय कवरासे ,उपसरपंच व सदस्यांनी उपकार्यकारी अभियंत्याला साकडे घालण्याची वेळ आल्याने मान्सूनपूर्व कामे करण्याकरीता निवेदन दिले.Maintenance of Mujor Mahavitraan incomplete..Gram Panchayat through representation to the Engineer.
गोवारी फिडर अंतर्गत येणारी गावे ढाकोरी, गोवारी,कुरई, डोर्ली, निंबाळा, देहूरवाडा, बोरी, मूर्ती हे गावे येतात. या परिसरात येणारी ११ kv लाईन खानबाधित व शेती शिवारातून येत आहेत. आता पावसळ्याची सुरुवात होणार आहे. त्यातल्या त्यात अजून विभागामार्फत ट्री कटिंगची व मेंटेनन्सची कामे झाली नाही.
ढाकोरी गावाजवळ रोडची उंची वाढल्याने पोलची उंची वाढवण्यात यावी. काही दिवसापूर्वी ट्रक ने तार तुटले, सुदैवाने मोठा अपघात टळला. भविष्यात मोठी अशीच मोठी दुर्घटना होऊ नये, त्याकरिता लवकरात लवकर पोलची उंची वाढवावी. शेतातून लाईन जाऊन असल्यामुळे पोल झुकलेले आहे. विजेच्या तारा लोंबकळत आहे, त्यामुळे पावसाळ्यात हलका पाऊस आला तरी लाईन जाते. झाडांमुळे फॉल्ट शोधण्यास अडचण निर्माण होते. यांना आढावा सभेतही ट्री कटिंग व मेंटेनन्स बाबत सूचना केली होती. मात्र अद्यापही पावसाळा जवळ येत आहे. तरी ट्री कटिंग व मेंटेनन्स कामाला सुरुवात केली नाही.त्यामुळे आता हि ट्री कटिंगची कामे, झुकलेले पोल सरळ करणे, लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुरळीत झालेले नाही.
तरीही कोणतीही जीवितहानी होण्याअगोदर मान्सूनपूर्व कामे आटोपून अन्यथा मोठ्या दुर्घटनेचे जबाबदार प्रशासन असेल यात माञ शंका नाही.