•नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस.
•घटना सीसीटीव्ही मधून झाले उघड.
अजय कंडेवार,वणी:- शहर सध्या भटक्या कुत्र्यांच्या विळख्यात सापडले आहे. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या रामपुरा वॉर्डातील नागरिकांवर हल्ले तसेच उभ्या गाडीचे कव्हर फाडणे हे असे नुकसान मागील 1 ते 2 महिन्यामध्ये सुमारे आठ ते दहा वेळा गाड्यांचे कव्हर फाडून नुकसान करणे तसेच भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. हल्ल्यामुळे नागरिकां नगरपालिकेविषयी मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.In front of the chief executive….. a mountain of problems
बघा हा व्हिडिओ……..!
शहर सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली तसेच अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. विशेषतः भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या खुले आमपणे फिरत आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना लक्ष केलं जात आहे. शहरातील रस्ते, चौक या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांचा हैदोस रोजरासपणे पाहायला मिळतोय. दिवसा आणि रात्री ही भटकी कुत्रे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात आणि यातूनच नागरिकांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडली जात आहेत.तसेच गाड्यांचे अति नुकसानही केल्या जात आहेत. हीच बाब एका व्हिडिओ मध्ये कैद झाल्याने जनतेचा अनेक प्रतिक्रया समोर येत आहे.
ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना महापालिकेने प्रभावी पावले उचलणे गरजेचे बनले.सुस्त झालेल्या नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची शोध मोहीम तसेच कुत्र्यांना पकडणे, नसबंदी करणे गरजेचे असताना मनपा मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी कोणाच्या घटना सातत्याने समोर येत असताना महापालिकेचे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या साठी धोकादायक असून येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा येथील नागरिकांमधून केली जात आहे.