Ajay Kandewar,Wani:- यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील अलीकडील बदल्यांमुळे पुन्हा एकदा पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वणी परिसराशी परिचित आणि यापूर्वी येथे कार्यरत राहिलेले PSI प्रवीण हिरे यांची आता पुन्हा एकदा वणी पोलीस ठाण्यात रीएंट्री करण्यात आली आहे. त्यामुळे “भाऊ आता परत आले” आहे.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी प्रशासकीय कारणास्तव झालेल्या बदल्यांमध्ये प्रवीण हिरे यांची प्रथम लोहारा येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मुकुटबनसारख्या महत्त्वाच्या ठाण्यात जबाबदारी देण्यात आली. आता त्यांची थेट वणी पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा आल्याने त्यांचे पुनरागमन चर्चेचा विषय ठरले.
दुसरीकडे, वणी ठाण्यातील कार्यशैलीमुळे विशेष ओळख निर्माण करणारे PSI सुदाम आसोरे यांची बदली मुकुटबन येथे करण्यात आली आहे. त्यामुळे “प्रवीणभाऊ तुम्ही वणीला या, आम्ही मुकुटबनला जातो” अशा आशयाच्या जबरदस्त चर्चा रंगताना दिसत आहेत. वणी हिरे पुन्हा चमकणार की धूळ खात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

