Ajay Kandewar :- हल्ली ज्याला त्याला एक वेड लागले आहे. शुभ्रवस्त्र वस्त्र घालून काहीना नेतेगिरीचा ‘फिल’ येतो तर काहींना “मी अमुक” असल्याचा “फिल ” येत आहे.त्यातूनच आरटीआय अर्जासह व तक्रारी करण्याचा उद्योग सुरू केला जातो. वेकोली प्रशासनातील अधिकाऱ्यांना, खाजगी कंपनीधारकांना असो की बँकांना किंवा पतसंस्थाना असो या सर्वांना वेठीस धरण्याचे पोटभरू धंदेच सूरू केले आहे.सध्या अशेच काहीं ‘स्टंट’चें चांगलेच क्रेझ सूरु असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे “एक तो अमुक”अनेक वर्षापासुन आरटीआय अर्जासह व तक्रारीदेणे, लोकांचा काड्या करणे व बदनामी करणे हेचं धंदे …. एका क्षेत्रातील स्वयंघोषीत “ निव्वळ लोकांचा काड्या करीत असल्याचें चित्रं दिसत आहे . “ना धड लिहिता येतं,ना वाचता येतं तरीहि “मी अमुक आहों”असा ताव देत असतो अशी गोट्यातून खमंग चर्चा सुरू आहे.
शहरात अनेक क्षेत्रातील स्वयंघोषितांनी हैदोस घातला आहे. थेट बँकेत आणि पतसंस्थेत जाऊन कर्ज न दिल्यास मी “हा अमुक”असल्याचा धसका देत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळें अनेक वेकोली अधिकारी, शासकीय अधिकारी, काहीं पोलीस अधिकारी व बँकधारक ही त्रस्त असल्याची विश्वसनीय माहिती समोर येतं आहे.