विदर्भ न्यूज,वणी- मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी येथे 13 जून ते 21 जून 2024 या कालावधीत आठवडाभराचे उन्हाळी शिबिर ‘फनामेंटल’ आयोजित करण्यात आले आहे. उन्हाळी शिबिर 6 ते 14 वर्षे वयोगटातील कोणत्याही शाळेतील मुला मुलींसाठी खुले आहे. शिबिराचे दररोजचे वेळापत्रक सकाळी 08:30 ते 11:30 आहे. शिबिरातील सहभागींसाठी बस सुविधा उपलब्ध आहे. सहभागींनी स्वतःची पाण्याची बाटली आणि टिफिन बॉक्स आणायची आहे.
या शिबिरात मेहंदी कला, इंग्रजी संभाषण, पाककला, स्कॅव्हेंजर हंट, संगीत, योग, कला आणि हस्तकला, कराटे, स्टोन पेंटिंग, लाठी काठी, सँड आर्ट ,लीफ आर्ट, पेपर आर्ट, फील्ड डे, सुरक्षा उपाय, बागकाम, प्रथमोपचार प्रशिक्षण, कठपुतळी शो, नृत्य, मानसिक गणित/ॲबॅकस, मातीची भांडी, ध्यान, एरोबिक्स फुटबॉल, बास्केटबॉल, खोखो, कबड्डी, रांगोळी, टास्क गेम यासारखे विविध उपक्रम आणि खेळांचे नियोजन करण्यात आले आहे.