अजय कंडेवार,Wani :- शहरातील रस्त्यालगत असलेले शेकडो वृक्ष तोडणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे निवेदन वणीकरांसह युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी स्थानिक प्रशासना मार्फत यवतमाळ जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले.Now, hundreds of tree fellers must be booked or else.
वणीत वृक्ष संवर्धन समितीद्वारे 2010 रोजी जवळपास 14 वर्षांपूर्वी संपूर्ण वणीत 650 झाडांची लागवड करण्यात आली. त्यांचे संगोपन करण्यात आले व त्यांना पाणी देऊन मोठे करण्यात आले. व झाडे मोठी झाल्यावर रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना वृक्ष आता सावली देऊ लागले होते. परंतु 2022 ला चिखलगाव रेल्वेक्रॉसिंग पासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यत सिमेंट रस्त्याचे काम मंजूर झाले. काम सुरु झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेले सगळे वृक्ष तोडण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने तोडलेल्या झाडांची लावगड केली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात रस्त्याच्या कडेला एकही झाड उरले नाही. उष्मघाताने अनेकांचा मृत्यू होत आहे. दिवसेंदिवस प्राणवायूची कमतरता भासत आहे. उन्हाच्या पारा आता 45 अंश से च्या वर गेला आहे. वातावरणात झालेला हा बदल वृक्ष तोडीने झाला आहे. ही बाब नाकारता येत नाही. रस्त्याने चालणाऱ्याला झाडांची सावली शोधावी लागत आहे. आता समोर पावसाळा आहे या पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात यावी. सोबतच ही झाडे तोडणाऱ्या अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. रस्ता बांधकाम करीत असतांना झाडे तोडण्याआधी झाडे लावण्याचा नियम असतो. परंतु या नियमाला ठेकेदार व अभियंता हे केराची टोपली दाखवितात.
जेव्हा की ,वणीत एक झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो ते शेकडो झाडे तोडणाऱ्यावर का गुन्हा दाखल करण्यात येऊ नये. हा सर्व प्रकार सर्वसामान्यांचा समाजण्या पलिकडचा आहे. म्हणून शेकडो झाडे तोडणारे ठेकेदार व अभियंता यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी युवासेना व वणीकर जनतेद्द्वारे या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 15 दिवसांच्या आता यांच्यावर कारवाई करण्यात न आल्यास युवासेना उग्र आंदोलन करणार असा खंबीर इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना सिद्धीक रंगरेज, चेतन उलमाले, सूरज नगराळे, तुळशीराम काकडे, प्रणय, कृषी काकडे, तेजस नागपुरे, सोमप्रकाश नरड, अविनाश पोटे, निखील चव्हाण, निलेश चिंचोलकर आदि उपस्थित होते.