•४५१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
•१ जानेवारीला होणार निकाल जाहीर
नागेश रायपुरे, मारेगाव:- भिम जयंती उत्सव समिती मारेगाव च्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधुन येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “संविधान गौरव दिन” परीक्षा ४ डिसेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजता दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्फुर्स प्रतिसाद दिला असुन यात तब्बल ४५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल १ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे या उद्देशाने भीम जयंती उत्सव समिती मारेगाव च्या वतीने नागरिक शास्त्र व भारतीय संविधानावर आधारित १०० गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांवर “संविधान गौरव दिन” परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा “अ” व “ब” या दोन गटात आली.यात “अ” गटात वर्ग ५ ते ८ वि मध्ये शिकत असलेले विद्यार्थ्यां सहभागी झाले. तर “ब” गटात वर्ग ९ ते १२ वि मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता आले.या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आपला उत्फुर्स प्रतिसाद नोंदवत तब्बल 451 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधुन जाहीर करण्यात येणार आहे. या बक्षीस वितरण समारंभात या परीक्षेत पास होणाऱ्या प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, संविधान प्रत, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या परीक्षेत परीक्षक म्हणून निलेश तेलंग, गौरव चिकाटे तर पर्यवेक्षक म्हणून दिलीप शंभरकर,राहुल चेके,दिलीप पाटील,पूनम वेले,वैशाली तेलंग,शोभाताई दारुडे, निकेश डोहणे, रेखाताई काटकर, दिगाबर दैने, हेमराज कळंबे, संदीप राजगडे, सुष्मा चिकाटे,धर्मराज सातपुते,संजय चचाने,मनोज लांजेवार,अभिजित पोहेकर यांनी काम पाहले. यावेळी भिम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष
नगरसेवक हेमंत नराजें, नागेश रायपुरे,वसुमित्र वनकर,ओमप्रकाश पाटील,मोरेश्वर खैरे,गीतेश तांमगाडगे, गौतम मालखेडे आदींनी परिश्रम घेतले.