•परिसरातील तमाम विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – भिम जयंती उत्सव समितीचे आवाहन
नागेश रायपुरे, (सहसंपादक, मारेगाव):-संविधान दिनाचे औचित्य साधुन येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उद्या 4 डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता, संविधान गौरव दिन परीक्षेचे आयोजन भिम जयंती उत्सव समिती मारेगावच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा “अ” व “ब” या दोन गटात घेण्यात येणार आहे यात “अ” गटात वर्ग ५ ते ८ वि मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असुन यात प्रथम बक्षीस रोख २०००/-, द्वितीय १५००/-, तृतीय १०००/- मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात आले आहे. तसेच “ब” गटात वर्ग ९ ते १२ वि मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होता येईल. यात प्रथम बक्षीस रोख २०००/-, द्वितीय १५००/-, तृतीय १०००/- मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात आले आहे. ही परीक्षा नागरिक शास्त्र व भारतीय संविधानावर आधारित १०० गुणांची वस्तुनिष्ठ प्रश्नांवर घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षेची नोंदणी फी केवळ २०/- रुपये ठेवण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण १ जानेवारी २०२३ रोजी ठेवण्यात आले आहे.
या परीक्षेत परिसरातील तमाम विद्यार्थ्यांनी सहभागी होवून याचा लाभ घ्यावा असे आवाहन भिम जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच अधिक माहिती करिता निलेश तेलंग – ८६२३८३२३८७, गौरव चिकाटे सर – ७९७२११४०४६, सौ.नूतनताई तेलंग – ९५२७४३३३५२, सौ.रेखा काटकर- ९७६७०९६६६ यावर संपर्क करावा.