•थेट सरपंच निवडीने गावकऱ्यात उत्साह.
नागेश रायपूरे, मारेगाव :- तालुक्यातील ११ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक काल तालुक्यात उत्साहात पार पडली.थेट सरपंच निवडीने गावकऱ्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले.संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने निवडणूक विभागात गोंधळ उडाला होता.
तालुक्यातील कान्हाळगाव, मच्छिंद्रा,वरुड,डोलडोंगरावर, अर्जुनी,सगणापूर, गोदनी, जळका,वाघदरा,खंडणी,सराटी या अकरा ग्रामपंचायतची निवडणूक कल उत्साहात पार पडली.पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने मतदारात कमालीचा उत्साह दिसत होते.
सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.दुपारी ३ वाजेपर्यंत ५०% टक्के मतदानाचा आकडा ओलांडला होता. संध्याकाळी मिळालेल्या माहिती नुसार मतदानाची टक्केवारी जवळपास ८३:४१%टक्के असल्याचे सांगण्यात आले.