•तालुक्यात तब्बल 10200 जनावरांचे लसीकरण
नागेश रायपूरे,मारेगाव– जिल्ह्यातच नव्हे तर आता मारेगाव तालुक्यातील गाव खेड्यात सुद्धा जनावारंवार लंपी स्किन डीसिज रोगाचा प्रार्दुभाव दिसू लागल्याने पशू पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागा कडून लसीकरण मोहीम तेजीत राबविण्यात येत असुन आजपर्यंत तब्बल 10,200 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
यात जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी येत येणे, सुरुवातीस भरपूर ताप येणे,डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव, चारा, पाणी खाणे कमी अथवा बंद करणे,दूध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे लंपि चे असल्याबाबत पशू संवर्धन विभागाकडुन माहिती देण्यात आली. तालुक्यात ऐकून चोवीस जनावरे बाधित आढळून आली होती त्या पैकी सतरा जनावरे औषधी उपचाराने बरी झाली असून, सात जवावरावर उपचार सुरू आहे. तालुक्यात मारेगाव , वेगाव, नवरगाव, डोंगरगाव (मार्डी) जळका या पाच ठिकाणी ई पी सेंटर सुरू केले असून या पाच किमी अंतरातील जवळपास 10200 जनावरांना लसीकरण करण्यात आले.
पशुपालकांनी काळजी घेण्याचे आवाहन…..
“चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी
संपर्क साधून उपचार करुन घ्यावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी कोणत्याही सभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना
चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे
डास, माश्या, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.आजारी जनावरावर विषारी औषध फवारणी करु नये.रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे. आदी जनावरांची काळजी घ्यावयाचे आवाहन प.स.मारेगाव चे पशुधन विकास अधीकारी बालाजी जाधव यांनी केले आहे.”