- विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळालीच पाहिजे.
अजय कंडेवार,वणी :- मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विजेचे भारनियमन बंद करणे तसेच शेतीसाठी 24 तास वीज मिळावी तसेच नवीन कृषिचे पंपाचे कनेक्शन त्वरित जोडणी करून देण्यात यावे अशा विविध मागण्या पूर्ण करून जनतेला न्याय मिळावा याकरिता माजी आमदार वामन कासावार यांचा मार्गदर्शनात मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने ता.23 ऑक्टो.पासून आमरण उपोषण मार्डी चौकातील पोलीस वेलफेअर पेट्रोलपंपासमोर सुरू असलेल्या उपोषण मंडपाला काँग्रेसचे पदाधिकारी डॉ.महेंद्र लोढा,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अफसरशेख , वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे व ओम ठाकूर यांनी भेट देत शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या उपोषणाला समर्थन करीत जाहीर पाठिंबाही दर्शविला.
मारेगाव तालुका हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये कधीही सातत्य राहत नाही. दरवर्षी खराब वातावरणामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडत जात असतो. अशातच आता शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असतांना वीज मंडळाकडून अघोषित भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे.
हे भारनियमन पूर्णतः बंद करण्यात यावे, शेतकऱ्यांना सिंचनाकरिता 24 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी, मारेगाव तालुक्यात 132 के व्ही चे उपकेंद्र सुरु करण्यात यावे, ग्राहकांची संख्या जास्त असल्याने नवीन वीज उपकेंद्राची मान्यता देण्यात यावी, 33 केव्ही चे नवीन वीज उपकेंद्र वनोजा देवी, कुंभा, वेगावरोहपट येथे उभारण्यात यावे, मारेगाव तालुक्यात सोलर प्लांट तयार करून जास्तीची वीज निर्मिती करण्यात यावी, शेतकऱ्याचे वीजबिल माफ करण्यात यावे, या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या दिवसात हा आंदोलन आणखी चिघडेल याची सर्वस्वी जबाबदारी संबधित प्रशासनाची राहील यात तिळमाञ शंका नाहीं. असा घणाघाती आरोपही उपोषण मंडपाला भेट देण्यात आलेले काँग्रेसचे पदाधिकारी डॉ.महेंद्र लोढा यांनी केला.