•शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां मंजूर करण्याची मागणी
नागेश रायपूरे , (उपसंपादक)मारेगाव :– शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून येत्या 15 फेब्रुवारी रोजी मारेगाव येथे चक्का जाम आंदोलन करण्या बाबतचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मारेगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्या घेवुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शिंदे – फडवणीस सरकार ला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यात कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये व सोयाबीन ला प्रति क्विंटल सात हजार रुपये हमी भाव जाहीर करुन त्वरित खरेदी चालू करावी. तसेच तूर व हरभरा पिकाची नाफेड मार्फत ऑनलाईन नोंद करुन त्वरित खरेदी चालु करावी. शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानूग्रह अनुदान त्वरित मिळण्यात यावे.तसेच पीक विम्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये समसमान जमा करावी. तसेच शेतातील कापूस, मोटरपंप, झटका बेटरी चोरी प्रकरणाचा शोध पोलिसांकरवी तत्काळ लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आदी मागण्या साठी हे चक्का जाम आंदोलन शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी प.स.माजी उपसभापती तथा तालुका प्रमुख संजय आवारी याचे नेतृत्वात होणार आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमूख संजय आवारी, शहर प्रमुख अभय चौधरी, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष मयुर ठाकरे, संजय लांबट,शेखर राऊत, दिवाकर सातपुते, अनंत निब्रड, शरद ताजने, गुरुदास घोटेकर आदी शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते.