माणिक कांबळे/ मारेगाव :- शहरातील सलून व्यवसायिक विठ्ठल शेट्टे यांचा वरोरा येथील रेल्वे पुला जवळ अपघाती मृत्यू झाला असून त्यांचा अंत्यविधी मारेगाव येथील मोक्षधामात ता 8जून ला दुपारी 2वाजता करण्यात आला आहे.
विट्टलराव शेट्ये यांचा मारेगावं शहरात सलून चा व्यवसाय होता. मनमिळावू स्वभाव असल्यामुळे ते शहरात लोकप्रिय होते. ते काही कामानिमित्य वरोरा येथे गेले होते. मात्र त्यांचा काल 7 जून ला अपघाती मृत्यू झाल्याची बातमी शहरात पसरताच त्यांच्या नातेवाईकांनी वरोरा येथे धाव घेत मृतदेहाची ओळख केली खात्री नंतर लगेच त्याच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणी करण्यात येऊन मृतदेह मारेगाव येथे आणण्यात आला होता.त्यानंतर त्यांचा अंत्यविधी 8जून ला येथील मोक्षधामात करण्यात आला आहे.त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.