अजय कंडेवार,वणी :- मुकुटबन येथील मादगी समाज महिला गटाकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 03 जानेवारी 2023 रोजी मादगी समाज मंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुटबन ग्रामपंचायत येथील सरपंच मीना आरमुरवार प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अनिल दुर्लावार,शिवरेड्डी आरमुरवार, कुसुमताई मडावी, गणेश आरमुरवार ,रामन्ना बट्टावार उपस्थित होते. याप्रसंगी कुमारी प्रियांशी पुंगुरवार, दस्मिता बट्टावार, रेश्मा दंडेवार, कशीश आरमुरवार या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनपटावर मनोगत व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा उघडल्या त्याद्वारे महिलांना शिक्षणाचे दारे खुले करून दिली आज महिला प्रत्येक क्षेत्रात सरस आहे .देशाचे सर्वोच्च पद महिलाकडे आहे .मला मिळालेले सरपंच पद हे सावित्रीबाई यांच्या पुण्याईने मिळाले. त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे आपल्या समाजाला सुद्धा शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. असे मनोगत सरपंच मीना आरमुरवार यांनी व्यक्त केले .प्राध्यापक अनिल दुर्लावार यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच कुसुम मडावी यांनी ही शिक्षणाविषयी माहिती दिली. राधा लिक्केवार यांनी सावित्री मातेवर सुंदर असे गीत म्हणत सर्वांना मंत्रमुग्ध केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश आरमुरवार यांनी केले व आभार कविता दुर्लावार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला वर्गाचे सहकार्य लाभले.