● भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि आजच्या भारताची अवस्था समजून घेण्याचे आवाहन
वणी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षाचा काळ लोटला असून आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. इंग्रजांच्या गुलामीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी राबविलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या उद्देश या देशात अन्याय, अत्याचार, शोषण न होता राजकीय स्वातंत्र्य सोबत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य तसेच भेदभाव संपवून समानता प्रस्थापित करणे हा होता. त्यासाठी असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांनी व क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण आज अमृत महोत्सव साजरा करीत असताना मात्र प्रश्न जैसे थे दिसून येते.

आपल्या देशाला जगातील सर्वात सुंदर व चांगले संविधान लाभले असतानाही भेदभाव, विषमता, जातीयता, धर्मांधता, संधींची कमतरता, बेरोजगारी हे प्रश्न भेडसावत आहेत? हे समजून घेणे अति महत्त्वाचे असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वणी उपविभागातील तीनही तालुक्यात पक्ष शिक्षण शिबिराचे आयोजन दि. १४ ते २४ सप्टेंबर २२ दरम्यान केले आहे. ह्या शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी भाग घेऊन वैचारिक उहापोह करून देशाला उज्वल भविष्याकडे न्यावे असे आवाहन माकपचे कॉ. शंकरराव दानव, कॉ.कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके, कॉ. चंद्रशेखर सिडाम आदीनी केले आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहास व कम्युनिस्ट पक्षाचे योगदान, स्वातंत्र्यानंतरच्या भारताची स्थिती व दिशा ह्या विषयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दि.१४ सप्टेंबर ला झरी तालुक्यातील भिवसन मंदिर, कमळवेली, दि.१७ सप्टें. शनिवारला केलापूर तालुक्यातील आदिवासी समाज भवन, पाटणबोरी, दि. २० सप्टें. मंगळवारला वणी तालुक्यातील विजासन देवी मंदिर, गोडगाव, दि. २४ सप्टें. शनिवारला मारेगाव तालुक्यातील शंकर मंदिर, मार्डी रोड, मारेगावला कार्यकर्ता शिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. ह्या शिबिराला पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. शंकरराव दानव, जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, जि. क. सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिराला यशस्वी करण्यासाठी कॉ. चंद्रशेखर सिडाम, मनोज काळे, उरकुडा गेडाम, अनिता खुनकर, गजानन ताकसांडे, कवडू चांदेकर, नंदकिशोर बोबडे, शिवशंकर बांदूरकर, किसनराव मोहूर्ले, खुशाळराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, रामभाऊ जिड्डेवार, सुरेखा बिरकुरवार, ऋषी कुलमेथे, भाऊराव टेकाम, शंकर गाऊत्रे, संजय कोडापे, दशरथ येनगंटीवार, शंकर भगत, अंकलू गोरलावार, सोनेराव मडावी, अशोक गेडाम, नेताजी गेडाम, प्रीती करमनकर, अहिल्या ताकसांडे , पपिता कोवे, उषा कोडापे, शोभा सरोदे, बेबी सरोदे, कुंता चटप, संदीप सुरपाम, संकोष चांदेकर आदी परिश्रम घेत आहेत.