•वणी तालुका व शहर महिला काँग्रेसचा वतीने विविध कार्यक्रम.
अजय कंडेवार,वणी :- जागतिक महिला दिनानिमित्तांनी शेतकरी मंदिर वणी येथे काल दिनांक 8 मार्च रोजी वणी तालुका व शहर महिला काँग्रेसचा वतीने भव्य कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगिता सं. खाडे (अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायण नागरी सह. पत मर्या. वणी “Women should be able to come without being bound by “hearth and child” – Sangita No. creeks”व कार्यक्रमाचे उद्घाटक वंदना आवारी (अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला कॉंग्रेस) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शारदा ठाकरे, अॅड. पोर्णिमा शिरभाते, अँड. वैशाली कवाडे व निलिमा काळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहूण्या उपस्थित होत्या.
मंजुषा वासेकर यांनी स्वागतगीत म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात केली. यामध्ये संघर्ष महिला किडा मंडळ, उकणी मंडळातील महिलांनी अनेक गावात जाऊन क्रिडा कौशल्य दाखविल्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच लालगुडा व मोहोर्ली येथील महिला क्रिडा मंडळातील महिला उपस्थित होत्या,त्यांचा सुद्धा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला योगदान म्हणून जेवणाची व्यवस्था पुनम राजु पिंपळकर यांच्याकडून करण्यात आले.
याप्रसंगी संघर्ष महिला किडा मंडळ, उकणीच्या सदस्या विद्या जुनगरी, वंदना चिंचोलकर, निता पारशिवे, स्नेहा शिवरकर, माहेश्वरी राजपुत, नंदा ताजणे, सोनाली झाडे, अर्चना खाडे, रजनी रासेकर, प्रियंका भूसारी कविता सोनवने, करुणा शिवरकर, अस्पना मजगवळी तसेच असंख्य प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संध्या बोबडे अध्यक्ष महिला कॉंग्रेस वाणी यांनी केले व संचालन कविता चटकी तर आभार प्रदर्शन सविता ठेपाले यांनी केला.
हा एक उपक्रम…..!
“धनोजे कुणबी शारदोस्तव समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त काल दिनांक 10 मार्च .2023 ला ‘आनंद बाल सदन’ येथील मुलांना बॅग्स, खेळाचे साहित्य, व फळे वाटप करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला शार्दोस्तव समितीच्या अध्यक्ष साधना मत्ते, मिनाक्षी देरकर ,संगीता खाडे, स्मिता नांदेकर, वंदना आवारी, साधना गोहकार, वनिता काकडे ,शारदा ठाकरे ,सीमा खाडे उपस्थित होते.”