‘विदर्भ न्यूज पोर्टल’ च्या बातमीचा दणका…!
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील कायर गावातील एका पळीचा शेतात झुकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारा वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे भयंकर असे चित्र या परिसरात दिसत होते.महावितरण विभागाकडून उघड्यावरच उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीची केबल टाकली होती. तसेच अनेक महिन्यापासून हा खांब झुकलेल्या अवस्थेत होता. गावात हाकेचाच अंतरावर महावितरणाचे कार्यालय असतानाही तसेच वारंवार तक्रार करूनही महावितरणने त्याची दखल घेतली नव्हती. याचा धोका लक्षात घेऊन “विदर्भ न्यूज पोर्टलने” “हाकेचा अंतरावरील शेतात विद्युत खांब झुकून….. अन् कर्मचारी सुस्त…..!”अशा आशयाची बातमी 15 मे रोजी प्रसिद्ध केली.Vidarbha News Portal’s news Impact.Awakened to Mahavitran…….
या बातमीची दखल घेऊन महावितरणने अवघ्या 3 दिवसातच त्या पळीचा शेतातील तुटलेले खांब काढून टाकली नवीन खांब उभे केले व त्या पळीतील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण ने दखल घेतली नव्हती. “विदर्भ न्यूज पोर्टलने “बातमी छापून वाचा फोडली. त्यामुळे महावितरणला जाग आली. तो घातक पोल शेतीकाम तसेच मशागतीच्या अगोदर सरळ केल्याने तेथील सर्व शेतकरी निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे ‘ विदर्भ न्यूज पोर्टलने’चे मनापासून आभार, असे तेथील शेतकरी यांनी मानले .