माणिक कांबळे/ मारेगाव :– महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे तालुका अध्यक्ष रमेश सोनुले यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे.मनसेचे नेते राजु उंबरकर यांचे ते निकटवर्तीय होते.MNS taluka president Sonule passed away.
२००९ पासून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता.त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने यशस्वी झाली.त्याना गेल्या काही दिवसापासून एका दुर्धर आजाराने ग्रासले होते.अनेक उपचारा नंतरही त्यांच्या प्रकुर्तीने साथ दिली नाही.अशातच त्यांचा आज सायंकाळी 3वाजता मेघे सावंगी येथील रुग्णालयात अखेर चा श्वास घेतला.मृत्यू समयी ते 63वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी नवरगाव माजी सरपंच संगीता रमेश सोनुले दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.