• हटके स्टाईलने सर्वांना परिचितच ” मनसे ”
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ही आपल्या आंदोलनाच्या (Protest style) हटके स्टाईलने सर्वांनाच परिचित आहे. खळखट्याक आंदोलन ही मनसेची सर्वाधिक ओळख असलेली आंदोलनाची पद्धत आहे. पण, वणीचा (Wani) मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. वणी शहरातील रस्त्यांवर अक्षरशः खड्डे (Patholes) पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याच मुद्द्यावर मनसेने निवेदन देत अनेकदा खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. परंतु, मागणी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने मनसेने खड्डे पडलेल्या ठिकाणी कमळाचे फूल लावण्यात आले.पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वणी यांच्या माध्यमातून वणी शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत आंदोलन करण्यात आले.Unique movement of MNS, ‘Lotus flower’ in the pit “MNS” is familiar to all with its haute style.Unique movement of MNS, ‘Lotus flower’ in the pit
नांदेपेरा रोडवर महाविद्यालये आणि शाळांचा समावेश असल्याने वर्दळ असते तसेच रेल्वे गेट असल्याकारणाने वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे. रस्ता खराब असल्याने प्रवाशी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या आंदोलनातून प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला.
रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना जीव देखील गमावला आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या कारणांमुळे “खड्यात कमळ” ही संकलपणा “लक्षात घेत नागरिकांचे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे,अजिद शेख, लकी सोमकुवर, शंकर पिंपळकर, वैभव पुराणकर, गुड्डू वैद्य, सारंग चिंचोळकर, लोकेश लडके, आदित्य अल्बलवार आदि उपस्थित होते.