•तीन पॅनल उभे, त्यात ‘गाव विकास परिर्तन पॅनलचा’ सरपंच उमेदवार ‘गाव विकास ‘करण्यास सक्षम आहे.- ग्रामस्थ, कायर
•गावात ‘एक पॅनलचा’ ठेकेदार म्हणतो शेती विकू पण आपला सरपंच आणू म्हणून शेत पार्टीत व ढाबा पार्टीत व्यस्त…. अशीही चर्चा
अजय कंडेवार,वणी:- सध्या वणी बहुतांश तालुक्यात 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. गाव म्हणजेच कायर इथल्या ग्रामपंचायत निवडणूक देखील होणार आहे.मग आता निवडणूक म्हटली की, ‘धुराळा’ उडणारच.. यात तर उमेदवारांचे निवडून येण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न तर राहतातच.. पण उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष जास्तच दिसून येत आहे . उमेदवार असलेले भाऊ दादांसाठी कार्यकर्त्यांकडून तर त्यांच्या वार्डात फिल्डिंग लावणी सुरु असते. त्यामुळेच आताच वेळ आहे, गावाच्या विकासाचं बघा..! फक्त निवडणुकीकरीता शिबिरे आयोजित करणे त्यातून मतदार यांना लोभ दाखविणे हा फक्त राजकारणाचा पब्लिक स्टंट मानला जातो. असेही काही उमेदवार उभे असल्याची माहिती आहे.
कायर गावात तीन पॅनल उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत, त्यात गाव विकास पॅनलचा सरपंच उमेदवार विकास करण्यास सक्षम असल्याने विजय दावेदार ही मानल्या जात आहे आणि एका पॅनलचे काही उमेदवार तर हे शेत पार्टी व ढाबा पार्टीत कार्यकर्त्यांना धनशक्तीने मतपरिवर्तन करीत असल्याचीही खमंग चर्चा आहे.आता यात ‘ ठेकेदार ” म्हणतो की,शेती विकू पण आपला सरपंच आणू म्हणून शेत पार्टीत व ढाबा पार्टीत व्यस्त…. अशीही चर्चा सुरू आहे.