•तब्बल वर्षभरात 200 कोटी…
•येत्या काळात 24 तास पाणी पुरवठा
अजय कंडेवार,वणी :- येत्या काळात वणी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून नक्कीच कायापालट करू त्यात काहीही शंका नाहीच असे स्पष्ट शब्दात आ. संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी काल दि.12मार्च 2023 रोजी रविवारला वणी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.All-round development of the constituency is definitely – MLA Sanjeevreddy Bodkurwar
वणी विधानसभा मतदार संघाचा महाविकास आघाडी शासनाच्या काळात ठप्प पडलेला विकास आता युती. शासनाच्या काळात भरधाव वेगाने होणार आहे. सत्ता परिवर्तनानंतर एक वर्षात तब्बल 200 कोटींचा निधी वणों विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आणण्यात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यश प्राप्त केले आहे. तसेच वणी विधानसभा क्षेत्रासाठी एका वर्षात राज्य शासनाकडून एवढा मोठा निधी इतिहासात पहिल्यांदाच मिळाला. तसेच पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयातर्फे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 5 कोटी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नामुळे 4 तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एका आर्थिक वर्षात एवढा मोठा निधी पहिल्यांदाच उपलब्ध झाल्यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील राज्य महामार्गाच्या विकासासाठी :-
47 कोटी रुपये, जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी 4.10 कोटी रुपये, ग्रामीण रस्ते विकासासाठी 24, 60 कोटी रुपये, जनजाती क्षेत्र उपयोजनेअंतर्गत आदिवासी भागासाठी 10.96 कोटी रुपये, जमीन अधिग्रहण करण्यासाठी 7 कोटी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ग्रामीण दलित वस्ती विकासासाठी 4 कोटी रुपये, 2515 अंतर्गत ग्रामीण भागासाठी 5 कोटी, वणी तालुक्यातील श्री. जगन्नाथ बाबा तिर्थक्षेत्र देवदाकरिता २ कोटी रु. जैताई देवस्थान वणी करिता १ कोटी रु. रंगनाथस्वामी देवस्थान वणी करिता १ कोटी रु.च गोडगांव देवी देवस्थान करिता १ कोटी रु. असे देवस्थानच्या विकासासाठी एकूण 5 कोटी रुपये निधी मंजुर झाले आहे. अशाप्रकारे वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी एकूण 100 कोटी रुपये या अर्थसंकल्पातून आणण्यात या क्षेत्राचा विकासाचा ध्यास घेतल्याने यश मिळाले आहे.
युती शासनाच्या काळातील मागील दिवाळी अधिवेशनात
वणी शहराच्या सिमेंट रस्त्यासाठी 15 कोटी रुपये, 25:15 अंतर्गत ग्रामीण भागासाठी 5 कोटी, वणी- बाबरी रस्ता, मोहदा टुद्रा रस्ता, खैरी- बड़की कडे जाणारा रस्ता पाटण झरी, माथार्जुन- सुरदापुर, झरी.पाटण, अडेगाव खातेरा, गणेशपूर- कौसरा, मारेगाव मार्डी या रस्त्यासाठी 80 कोटी रुपये आणले होते. या निधीची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत.All-round development of the constituency is definitely – Aa. Sanjeevreddy Bodkurwar
घोन्सा शिबला मार्गाने केळापुर- जाणारा मार्ग, वणी नांदेपेरा मार्ग खैरी वडकी कडे जाणारा मार्ग, चारगाव शिदोला पासून चंद्रपूरच्या सीमेपर्यंतचा रोड, रासा – करणवाडी कुंभा खैरी पर्यन्तच्या प्रस्तावित रस्त्याच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गांसाठी फार मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती या विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार दिली.
या आयोजित पत्रकार परिषदेला संजीवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा क्षेत्र),दिनकर पावडे (ज्येष्ठ नेते), विजय पिदुरकर ( माजी जि.प सदय) तारेंद्र बोर्डे (माजी नगराध्यक्ष), संजय पिंपळशेंडे (माजी पं.स सभापती) ,श्रीकांत पोटदुखे, संदिप बेसरकर व सत्यजीत ठाकूरवार यांच्यासह सर्व पत्रकार उपस्थित होते.