•”त्या ” नराधमांना फाशीची शिक्षा द्या.
अजय कंडेवार,वणी:- देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथे महिलांवर झालेले अत्याचार देशाला हादरवून टाकणारे आहेत. या अत्याचारा विरोधात वणी येथील तमाम महिला संघटना पेटून उठले आहे.मणिपूर हिंसाचार तथा महिलांच्या नग्न धिंड प्रकरणी दोषी असलेल्या नराधमांवर कठोर कारवाई करून मणिपूर सरकार बरखास्त करण्यात यावे या करीता वणी येथील सर्व सामाजिक संघटना एकत्र येत “जाहीर निषेध रॅली” काढण्यात आली तसेच यवतमाळ जिल्हा अधिकारी यांचा मार्फत राष्ट्रपती यांना निवेदाद्वारे साकडे घालण्यात आले.Dismiss Manipur Govt..Give death penalty to “those” murderers.
अनेक महिन्यांपासून इशान्य भारतातील मणिपूर राज्यात हिंसाचार, यादवी सुरु असून अनेक निरपराध लोक, वृद्ध, लहान बालके, स्त्रिया अशा अनेकांना नाहक जीव गमवावे लागत आहेत, अनेकांनी भीतीपोटी घरे सोडली असून खासगी व सार्वजनिक मालमत्तांचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यातच अलीकडे प्रसारित झालेला स्त्रियांची नग्न धिंड काढलेला व त्यांच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगणारा समाजमन सुन्न करणारा, लोकांमध्ये संताप आणि चीड आणणारा आहे. ही अशी मानवतेला काळिमा फासणारी घटना केवळ एक भारतीय म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही आपल्याला लज्जास्पद आहे. म्हणून समस्त संघटनेचावतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले.मणिपूरमध्ये सरकार अस्तित्वात आहे की, नाही हा प्रश्नच आहे. अशावेळी प्रधानमंत्रीही एक शब्द न बोलता मौन बाळगून आहेत्यामुळे अशा बिकट प्रसंगी अधिकारांचा योग्य वापर करून मणिपूर येथील सरकार बरखास्त करावे आणि स्त्रियांची नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांना कठोर कारवाई करून फाशी देण्यात यावी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
यावेळी छाया वागदरकर,किरण नांदेकर, सीमा पोटदुखे, रेखा बोबडे सीमा कुमरे, आशा कोवे, लता मडावी,स्वप्ना पावडे, वसुधा ढाकणे, हर्षदा चोपणे, सरिता घागे, किरण गोडे ,मीनाक्षी टोंगे, निशा खामनकर, विशाखा चौधरी,सुनीता वागदरकर,माया पेंदोर, सुनिता शेरकी, पूनम भोयर, काळे, सोनाली जेनेकर या समस्त महिला उपस्थित होत्या.