•भाजप पुन्हा स्वबळावर विजयी होईल.
अजय कंडेवार,वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे @9 वर्ष पुर्ण झाले आहे. त्यानिमीत्य महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभुमिवर केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना एकवटलेल्या विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना चेतवले. विरोधक एकवटले तरी 51 टक्के मतदान भाजपलाच देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे स्पष्ट केले. यावेळी व्यासपिठावर माजी गृह राज्यमंत्री तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थीत होते.
कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येथील शेतकरी मंदीर मध्ये भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुपेंद्र यादव यांनी विस्तृत विवेचन केले. तर हंसराज अहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा स्वबळावर विजयी होईल आणि देश विकासाच्या मार्गावर चालेल असा विश्वास व्यक्त केला.
आयोजित संमेलनाकरीता वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यनिष्ठ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार पदाधिकारी व बुथ लेवलचे कार्यकर्ते उपस्थीत होते. यामध्ये जिल्हा सरचिटणीस, रवि बेलुरकर माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा परीषद सदस्य विजय पिदुरकर, जेष्ठ नेते दिनकर पावडे, नितिन वासेकर तसेच महीला आघाडीच्या पदाधिकारी, भाजयुमोचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.