Ajay Kandewar,वणी :— नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या अंतर्गत राजकारणाने पुन्हा एकदा तापमान वाढवले आहे. आधीच खिंडार पडलेल्या संघटनात आता आणखी कोणता स्फोट होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.प्रश्न फक्त उमेदवार निवडीपुरताच मर्यादित नसून, कोणत्या प्रभागातून कोणाचा पत्ता कट होणार? कोण उमेदवारीवरून बंडखोरी म्हणून बाहेर पडणार? की एखादा पदाधिकारीच पक्षाला राजीनामा देऊन नवीन समीकरणांची निर्मिती करणार? अशा अनिश्चिततेने संपूर्ण भाजपातील वातावरण ढवळून निघाले आहे. अश्या अनेक प्रश्नांना अनुत्तरितच आहे.
भाजपाच्या अंतर्गत नाराजी, गटबाजी आणि काहीची तटस्थ भूमिका यामुळे पक्षाची निवडणूक रणनीतीच कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, काही महत्वाचे चेहरे उमेदवारीतून वंचित राहण्याची भीती असल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे.स्थानिक पातळीवरील एक अचानक बैठकींत राजीनामा देणार का?” अशी चर्चा आणखी तीव्र झाली आहे. दुसरीकडे, एकान तर स्वतंत्र रस्त्यावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्याची कुजबुज देखील वेग घेत आहे.
विरोधक तर या घडामोडींवर बारकाईने नजर ठेऊन आहेत. भाजपाचे अंतर्गत पडसाद बाहेर उमटले तर नगरपरिषदेच्या “निकालावर” त्याचा थेट परिणाम होणार, हे निश्चित. त्यामुळे भाजपासाठी ही वेळ कठीण, निर्णायक आणि अत्यंत संवेदनशील असेल, असे राजकीय मत आहे.नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असतानाच भाजपाची ही ‘धोक्याची घंटा’ नेमकी कोणासाठी – उमेदवारांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी की संपूर्ण संघटनासाठी?याचे उत्तर येत्या काही दिवसांत मोठ्या राजकीय उलथापालथीतूनच समोर येणार आहे.

