•रेकॉर्डवर असलेल्या सराईत आरोपी ताब्यात
•पोलीसांना पाहताच तरुणांनी काढला पळ
अजय कंडेवार,वणी:- अनेकदा आनंदाच्या भरात माणूस असं काही करून जातो, ज्याचा त्याला नंतर चांगलाच पश्चाताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मात्र, यात जे काही घडलं ते अतिशय धक्कादायक आहे. राजूर परिसरात दि.28 नोव्हे सोमवार रोजी रात्रीचा दरम्यान जन्मादिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रम आनंदात केलेल्या अग्नीशस्त्राद्वारे हवेत 2 वेळा फायर करून वाढदिवस साजरा करणा-या सराईत गुन्हेगार उमेश किशोरचंद राय (वय 30 ),रा. प्रगतीनगर ,कोलार प्रिंप्री, ता.वणी याला पोलीसांनी मुसक्या आवळल्या व वणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर, उमेश किशोरचंद राय रा. प्रगतीनगर कोलार प्रिंप्री ता.वणी हा युवक सराईत गुन्हेगार आहे.कारण पोलीस स्टेशन वणी येथे खुन,अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असुन उमेश हा मागील १ वर्षापुर्वी खुनाचे गुन्हयातुन कारागृहातुन सुटला होता. मागिल काही महिन्यांपासून अग्निशस्त्र बाळगुन फिरत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती म्हणून वणी पोलीस त्याचे मागावर असतांना तो पोलीसांचे हाती येत नव्हता व पोलीसांनाचा वारंवार गुगांरा देत होता.
राजुर ते भांदेवाडा रोडलगत असलेल्या मनोज कश्यप यांचे शेतात उमेश राय याचे वाढदिवसानिमीत्ताने पार्टी आयोजीत केली होती.अश्या माहीतीवरून वरिष्ठांचा मार्गदर्शनात P.I अजित जाधव यांनी दि.28 नोव्हे. रोजी रात्री 2 वाजताचा सुमारास ताफ्यासह पोहोचले असता वाढदिवस सुरू असलेल्या शेतात इसमांची पळापळ सुरू झाली .त्यातच उमेश राय हा देखील पळू लागला.त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडले व त्याची झडती घेतली असता त्याचाजवळ एक स्टिलची जिचे मुठीवर लाकडी पट्टी असलेली मॅग्झीनची पिस्टल (अग्नीशस्त्र) सापडली.
त्यास पिस्टल बाबतविचारणा केली असता,वाढदिवस निमीत्ताने घेवुन आलो व वाढदिवसाचा केक कापतांना दोन रांउड हवेत फायर केले असल्याचे सांगीतले त्याकडून पिस्टल व दोन खाली केस जप्त करण्यात आले. पोलिस स्टेशन वणी येथे विविध कलम ३,७,२५,२७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी उमेश राय यास अटक करण्यात आली.सदरची कार्यवाही वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली P.I अजित जाधव ठाणेदार वणी, API दत्ता पेंडकर,सुदर्शन वानोळे,पंकज उंबरकर,संतोष आढाव, अमोल अन्नेलवार,अविनाश बनकर, विशाल गेडाम,श्याम राठोड, मो. वसीम,पुरूषोत्तम डडमल, गजानन कुडमेथे व निरंजन खिरडकर यांनी केली.