Ajay Kandewar,Wani :- नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत प्रख्यात शिंदोला येथील शिवेचा मारोती देवस्थानात भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. संजय निखाडे मित्र परिवाराच्या वतीने शिंदोला येथे 1 जाने 2025 महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहेत.
रक्तदानाला सर्वात मोठे दान मानले जाते. रक्तदानामुळे दुसऱयाचा जिव तर वाचतोच त्यासोबतच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीलाही आरोग्याचे अनेक फायदे होतात म्हणून एक लक्ष पिशव्यांचे रक्त संकलन संकल्प पूर्ततेसाठी जत्रेत भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दरवर्षी देवस्थान कमेटी,शिव बहुउद्देशिय संस्था व संजय निखाडे मित्र परिवार करीत असते.संकलित रक्तपिशव्या शासकीय रक्तपेढीला सुपूर्द करून गरजू आणि गरीब रुग्णांना पुरवल्या जातात त्यामुळं चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने 1 जाने.सकाळीं 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत “भव्य दिव्य रक्तदान महाशिबीर” असणार आहे.यावर्षीही यात्रा महोत्सवातील उच्चांकी गर्दी आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिसरात चर्चेचा विषय ठरणार आहे.तसेच प्रबोधनकार -ह.भ.प.नयनपाल महाराज यांचा माध्यमातुन समाजप्रबोधन संकल्पाचे वाहणारे वारे नव्या वर्षात उमेद घेऊन येणार आहे व या यात्रेत शिवेचा मारोती देवस्थान कमिटी, गुरुदेव सेवा मंडळ, माऊली परिवार, संजय निखाडे मित्र परिवारातर्फे यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघांचे खासदार संजय देशमुख व वणी विधानसभा नवनिर्वाचीत आमदार संजय देरकर यांचा जाहिर सत्कार घेण्यात येणार आहे. विधानसभेतील समस्त सरपंच यांचाही सत्कार करण्यात येईल ही बाब आकर्षक असेल
•सामाजिक उत्तरदायीत्वाची परंपरा….
“ग्राम पंचायत शिंदोला व परमडोह, चनाखा, कळमना, पाथरी, कुर्ती, येनक, शेवाळा, येनाडी, येनक, कोलगांव, कवडशी भाखरा, चिखली, टाकळी, मुंगोली, माथोली, कैलासनगर, सावंगी, नायगांव, कुरई, गोवारी, शिवणी, चिंचोली, पुनवट, पुरड शिवारात दरवर्षी 1 जानेवारीला हि यात्रा भरते. शिवेचा मारोती देवस्थान कमिटी, गुरुदेव सेवा मंडळ, माऊली परिवार, संजय निखाडे मित्र परिवार आणि परिसरातील असंख्य भाविकभक्तांच्या सक्रिय परिश्रमातून या जत्रा महोत्सवाला सामाजिक उत्तरदायीत्वाची परंपरा लाभत आहे.”