•रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त.
माणिक कांबळे / मारेगाव:- वर्धा नदीवरील आपटी दांडगाव घाटावर गेल्या काही दिवसा पासून अवैध रेतीचा उपसा सुरु आहे. या घाटावर जवळपास 15-20ट्रक्टर चोरट्या मार्गाचा वापर करीत रेतीची तस्करी करीत आहे.याबाबतची कुणकुण लागताच भरारी पथकाने दि.16 जुन सकाळी 8 वाजता धाड टाकली असून घटना स्थळावरून 2 ट्रक्टर जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.
शासनाने रेतीघाट लिलाव न केल्यामुळे रेती तस्करीला उधाण आले आहे. वर्षभर या रेतीघंटावरून अवैध रेतीचा उपसा सुरु असताना ठोस उपाय योजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे रेती तस्करीला अच्छे दिन आले होते. नुकतेच नव्याने रुजू झालेले तहसीलदार यु. एस. निलावाड यांनी पहाटे ४ वाजेपासून चोरट्याच्या मागावर पाळत ठेवून ही कारवाई दांडगाव घाटावर करण्यात आली आहे.
विशाल अभिमान लांबट रा.दांडगाव असे एका रेती चोरट्याची नाव असून विनोद पंढरी ढेंगळे रा.दांडगाव अशी दुसऱ्या रेती तस्कराची नावे आहेत. दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात जप्तीत ठेवण्यात आला आहे.
तहसीलदार यु.एस.निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई करण्यात आलेल्या मिशनमध्ये मंडळ अधिकारी अमोल घुगाने,चालक विजय कनाके पोलीस विभागाचे एएसआय प्रमोद जिड्डेवार, नापोका अजय वाभीटकर यांनी परिश्रम घेतले.