•जर वाहने समोरासमोर आल्यास…...
माणिक कांबळे/ मारेगाव :- खडकी बुरांडा ते हटवांजरी या रस्त्याच्या मुरूम शोल्डर वाहून गेल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षात सरांटी, पेंढरी, बुरांडा ते हटवंजारी या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 151.77 लाख रुपये पॅकेज मंजूर करण्यात आले होते. या मंजूर निधी मधून 2.535 की. मी.अंतर लांबीचा तर 3.75 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला असून रस्त्याचे शोल्डर 1 मि.मी. मुरूम टाकून तयार करण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता.Traffic jam on Buranda road.If the vehicles come face to face….

दरम्यान2.145की मी अंतर डांबरीकरण तर बुरांडा गावातून सिमेंट काँक्रीटिकरण 0.390की.मी.अंतर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे शोल्डर वाहून गेले आहे.त्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास अपघाताची शक्यता बळावली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागा मार्फत मंजूर कामाचा कंत्राट यवतमाळ येथील एका कनष्ट्रक्शन कपंनीला देण्यात आला होता 9 आक्टोबर 2019ला पूर्ण झालेल्या या कामाला 4 वर्ष पूर्ण झाले असून देखभाल करण्याची मुदत 9आक्टोबर 2024 पर्यंत आहे. मात्र दरम्यानच्या कालावधी मध्ये कंष्ट्रक्शन कपंनी कडून ही कामे करण्यात आलेली नाही देखभाल व दुरुस्तीची मुदत 4महिन्यात सपुष्टात येत असून त्या दृष्टीने कुठलीही हालचाल दिसून येत नाही. शासनाकडे या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्ती साठी 10.62लक्ष रुपये जमा असून अनुचित प्रकार घडण्या पूर्वी शिल्लक कामे पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

