•भद्रावती तालुका क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा.
•177स्पर्धकांनी घेतला सहभाग
विदर्भ डेस्क,वणी:- बुद्धीबळ हा बुद्धीचा क्रीडा प्रकार आहे. त्या मध्ये स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवून आज स्पर्धाच्या युगात प्रत्येक अपयशावर मात करून टिकुन राहण्यासाठी व बुद्धीच्या जलद व सर्वांगीण विकासासाठी बुद्धीबळ खेळ आवर्जुन खेळावा असे आव्हान अध्यक्ष पांडुरंग सोमाजी आंबटकर यांनी उदघाटन प्रसंगी यश प्राप्त विद्यार्थांना मार्गदर्शन केले.Best chess game for quick development of intelligence – Pandurang Atvkar•This tournament is for the first time in the history of Bhadravati Taluka sports field.
भद्रावती तालुका क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच
अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट व मायक्रुन स्टुडंन्ट्स अकादमी सुमठाणा,भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 एप्रिल 2023 रोज रविवार मॅकरून स्टुडंन्ट्स अकादमी, सुमठाणा,भद्रावती येथे प्रथम जिल्हास्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धा उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.
या बुद्धीबळ स्पर्धा चे उदघाटक पांडुरंग सोमाजी आंबटकर (कार्यक्रम अध्यक्ष –अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेन्सई दुष्यंत नगराळे (अध्यक्ष – अमेचुर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट),आशुतोष गयनेवार(अध्यक्ष – चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर जिम्नॅस्टिकस असोसिएशन), ऍड.राजरत्न पथाडे(अध्यक्ष- फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट),मा.डॉ. अंकुश आगलावे (अध्यक्ष – एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट),राजदा सिद्दीकी( मुख्यद्यापिका,MSA, भद्रावती ),अजय पाटील ,ऍड.मनीषा पथाडे,अलका मोटघरे (संस्थापक सचिव रोप स्किपिंग असोसिएशन,चंद्रपूर ),ऍड.मलक शाकिर, ऍड.अमर फुलझले इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.