Friday, April 17, 2026
HomeBreakingबघा.....वणी तहसील कार्यालयात "पिचकाऱ्या... तरी अव्वल...!

बघा…..वणी तहसील कार्यालयात “पिचकाऱ्या… तरी अव्वल…!

•तहसीलदार साहेब ऑफिस आहे की, पानटपरी . •कागदावरचा "स्वच्छतेची पोल खोल", बोंबा मोठ्या का?

Ajay Kandewar,Wani:- राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा” कृती आराखडा” हा उपक्रम राबविण्यात आला. अमरावती विभागातील सर्व तहसीलदारांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीन तहसीलदारांची निवड केली होती. त्यामध्ये अंतिम मूल्यमापनानंतर वणी तहसील कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला परंतु ” स्वच्छतामध्ये  वणी तहसिलची पोल खोल “झाली . त्यात ते”शून्य” नियोजन आढळले. ही धक्कादायक बाब पुढें आली.

शासनाकडून स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मोहीम राबविली आहे. परंतु ही मोहीम केवळ वणी तहसिल प्रशासनानें “कागदावरच” राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तहसीलचा बहुतांश भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या आहेत.मग याला काय म्हणावे “पुढें पाठ मागें सपाट”अशी दयनीय स्थिती आहे . शासनाची दिशाभुल करुन कागदावर रेकॉर्ड रंगविण्यात आल्याचे या “पिचकाऱ्या” मधून वणी तहसिलचा स्वच्छतेबाबत “पोलखोल” झाली आहे. म्हणून अस्वच्छतेत “वणी तहसिल” अव्वल ठरली असं म्हणने चुकीचे ठरणार नाही.शासकिय कार्यालयात गुटखा/तंबाखूचे सेवन करण्यास प्रतिबंध असतांना देखील चक्क अधिकाऱ्यांच्या कॅबिन समोरच “पिचकाऱ्या” दिसणे म्हणजेच काय म्हणावे या पिचकाऱ्या अधिकाऱ्यांचा की जनतेचा हा जीवंत प्रश्न दिसत आहे. तरीही वणी तहसील कागद रंगविण्यात “अव्वल” दिसत आहे.

•स्वच्छतेचा रेकॉर्ड मागें “घाण ठेवून”, “स्वच्छतेचा बोंबा

तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय. तालुक्यातील विविध गावातील नागरिक तहसील कार्यालयात विविध प्रकारच्या शासकीय कामाकरीता रोजच येत असतात. तहसील कार्यालयात महसूल विभागाचे विविध केबिन आहेत.तहसील कार्यालयात प्रवेश केल्याबरोबर आत मधल्या रिकाम्या जागेवर जागोजागी चक्क खर्याच्या पिचकाऱ्या, सुपाऱ्या, पहावयास मिळतात.शासकीय कर्मचारी देखील तंबाखूचे सेवन करतात का? असून शासकीय इमारती रंगवण्याचे काम कोण करत आहे.या कृती आराखडा तयार करतांना अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष का गेले नसावें की थातूरमातूर स्वच्छता फक्त कागदावर रंगवून तहसीलदार यांचाकडे दिले.यात शासनाची दिशाभुल करुन ” स्वच्छतेचा रेकॉर्ड सादर केला आणि मागें “घाण ठेवून” वणी तहसील “स्वच्छतेचा बोंबा “ मारत असल्याचं या पीचकाऱ्यातुन दिसत आहे.विशेष म्हणजे कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्यांनी केलेली घाण कशी अधिकाऱ्यांना दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page