Tuesday, May 13, 2025
HomeBreaking Newsफूस लावून पळविने पडले महागात.....!

फूस लावून पळविने पडले महागात…..!

आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवानगी.

अजय कंडेवार,वणी :- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. आरोपी नबी गुलाम रजब अली (वय 22 वर्ष) रा. राजुर (इजारा) ता. वणी जि.यवमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या बयानावरुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 366 (अ), 376 (2)N व पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार नवी गुलाम रजब अली यां ओळखीतील एका 15 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. दम्यान आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत 12 जुलै रोजी मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात अज्ञाताने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ शोध मोहीम सुरु केली. दरम्यान आरोपी हा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे नातेवाईकाच्या घरी लपून असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलीस पथकानी रात्रीच चंद्रपूर येथून आरोपी गुलाम रजब अली आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले..

महिला पोलीस अधिकारी यांच्या समोर पीडित मुलीचे बयान नोंदविले. आरोपी यांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केल्याचे उघड होताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 366 (अ), 376 (2)N व पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला शुक्रवार ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.सदरची कारवाई गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात P.I अनिल जाधव यांचा आदेशाने PSI आशिष झिमटे, पोका शुभम सोनुले व चमूने केली तसेच पूढील अधिक तपास आशिष झिमटे करीत आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments