• पोलिस यंत्रणा लागली कामाला…
अजय कंडेवार,वणी :- गेल्या 6 महिन्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारी जवळपास 90 तरुणी व विवाहित महिला बेपत्ता असल्याचा तक्रारीवरून धक्कादायक माहिती समोर आली आहे.यामध्ये 14 ते 18 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून, या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.Deception of love’ is dangerous for parents and police. Police system started working…
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात दररोज एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते. मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते. मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन, तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात. पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन, तिला परत घेऊन येतात. संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो. कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो. यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात. त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात. मात्र, यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते.
प्रेम प्रकरणात पळून जाणाऱ्या मुली १४ ते १७ वयोगटातील आहेत. त्यांना भविष्याबाबत एवढी जाण नसते. त्यामुळे त्या गुंड, मवाली मुलांच्या प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढल्या जातात. या वयात शारीरिक बदल होतात. सोशल मीडिया, चित्रपटांमधील हिरोगिरीच्या आकर्षणाचा त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे मुली पालकांचा विचार न करता पळून जातात. मात्र, आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना त्यांना येत नाही. काही मुली संबंधित मुलासोबत लग्न करून संसार करतात. पण, काहींना आयुष्यभर या घटनेचा प्रश्चाताप करण्याची वेळ येत असल्याचे दिसून आले आहे.’
पालकांचेही होतेय दुर्लक्ष……..
कामासाठी बाहेर पडल्यानंतर काही आई-वडिलांचे त्यांची मुले काय करतात याकडे लक्ष नसते. घरी असलेले काही आई-वडीलही त्यांच्याच नादात असतात. त्यामुळे पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत आहे. कामावरून आल्यानंतर सतत मुलांवर ओरडणे, चिडचिड करणे यामुळे मुले पालकांपासून दूर जातात; तसेच पालकांकडे मुले मन मोकळे करीत नाहीत, असेही काहीचे मत आहे.
अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यानंतर अशा घटनांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. या घटनांमध्ये प्राधान्याने या मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते. त्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागामार्फत काम केले जाते. पोलिस ठाण्याच्या पातळीवरही मुलींचा तत्काळ शोध घेतला जातो.