•शांतादेवी खुराणा यांचे दुःखद निधन
नागेश रायपुरे, मारेगाव:– श्रीमती, शांतादेवी रामस्वरूप खुराणा यांचे आज 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान वणी येथे दिर्घआजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्षाचे होते.या दुःखद घटनेमुळे खुराणा परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
श्रीमती, शांतादेवी रामस्वरूप खुराणा या कुंभा ग्रामपंचायत चे माजी सरपंच, तसेच वसंत जिनिंग चे माजी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रेमकुमार (कालुसेठ) खुराणा यांच्या त्या मातोश्री होत्या. यांचे पश्चात तीन मुले, चार मुली, नातवंड असा मोठा आप्तपरीवार आहे.
उद्या दिनांक 25 डिसेंबर रोज रविवारला दुपारी 1 वाजता दरम्यान वणी येथील यांचे राहते घरुन यांची अंत्ययात्रा निघणार आहे.यांचे जाण्याने अवघ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.