Ajay Kandewar,Wani:- शिरपूर ते आबई फाटा हा 4 किलोमीटर लांबीच्या मार्गाची अवस्था प्रचंड दुरवस्था झाली आहे आणि त्या मार्गावरून दररोज पाचपट वजनाची हजारो अवजड धावताहेत. अद्यापही या रस्त्याचे काम सूरू झालेले नाही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ सूरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असुन बुधवार (दि.19) मार्च रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांचे नेतृत्वात उबाठा गटाने वणी बांधकाम उपअभियंता यांना निवेदनातून मागणी केली आहे.जर येत्या आठ दिवसांत कामे झाले नाही तर ,तिव्रस्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं इशारा देण्यात आला
शिरपूर ते आबई हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे २४ तास वाहनांची वर्दळ या मार्गावरून असते.या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणा-यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील खड्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात होतात. वणी ते कोरपना या रस्यावर शिरपूर ते आबई फाटा या दरम्यान काहीं फुटाच्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी 2 ते अडीच फुटाचे मोठ मोठे खड्डे पडले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने त्या खड्यात पाणी गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.मुख्यतः वणी तसेच चंद्रपूर, कोरपना इत्यादी साठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. शिवाय शिरपूर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, वणीची बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर होतो. मात्र इथे असलेल्या खड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.या ठिकाणी उपचारा साठी गरोदर माता, जेष्ठ नागरिक, लहान बालके, यांना प्रवास करताना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी हाडाचे, पोटाचे, आजार असणाऱ्या प्रवाश्यांच्या आजारपणात खर्चात वाढ झाली, अशी या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांची तक्रार होत होती. सदर या रस्त्यावरून कोळसा, सिमेंट, गिट्टी डोलोमाइन्स यांची वाहतूक करणारी अवजड वाहने व दुचाकी ऑटो यांना तारेवरची कसरत करीत लागत होती. तसेच बेरोजगार युवकांनी रोजगारासाठी घेतलेले ऑटो, छोटा हत्ती, मेट्याडोअर याचा रस्ता नादुरुस्तीमुळे दुरुस्ती खर्च वाढून बँक कर्ज भरणे कठीण झाले. “खड्यात रस्ते कि, रस्त्यात खड्डा” अशी जागोजागी मृत्यूकुंड निर्माण झाले आहे
येत्या आठ दिवसात बाधकाम विभागानं रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष स्थानिक नागरिकांना सोबत घेत आ.संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड दम शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे व उबाठा गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.

