Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील विदर्भा नदीपात्रातून नेरड,पुरड,कुंड्रा,चिलई,तेजापुर व आमलोन गावातील रेती चोरटे मस्त डाव मारीत महसूल बुडवीत काहीं निष्क्रीय अधिकाऱ्यांचा मदतीने शासनाचा तिजोरीला चुना लावत आहे. या गावातील रेती चोरट्यात अव्वल शिरजोरी करणारा तो “विलास” यावर मात्र ते “निष्क्रीय अधिकारी” दिलखुलास मैत्री असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
विदर्भा नदीपात्रातून रेती तस्करी करणाऱ्यांचे जवळपास 3 ते 4 गट पडल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. त्या तस्करांमधील”विलास “हा “काहीं निष्क्रीय अधिकाऱ्यांशी” आर्थिक साटेलोटे करून आपली पोळी शेकण्याचे काम करीत असल्याची चर्चा सध्या गावात रंगत आहे. हा नेमका विलास कोण? नदीपात्रातून रात्रदिवस ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतूक होत असते माञ “त्या ” काहीं अधिकाऱ्यांची रेती चोरट्यांवर विशेष मेहरबानी असेल यातही शंका निर्माण झाली आहे अशी देखील खमंग चर्चा रंगू लागली आहे.