Tuesday, May 26, 2026
HomeBreaking Newsप्रभाग १३ मध्ये शिंदे सेनेचा जोरदार शक्तीप्रदर्शन..

प्रभाग १३ मध्ये शिंदे सेनेचा जोरदार शक्तीप्रदर्शन..

•कु.पायल तोडसामांच्या नेतृत्वाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....

Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १३ मध्ये निवडणुकीला अवघे काहीं दिवस शिल्लक असताना शिंदे सेनेच्या प्रचारमोहीमेला जिल्हा संघटक विजय चोरडिया यांचा नेतृत्वात मोठी गती मिळाली आहे. कुणाल चोरडिया यांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच संपूर्ण प्रभागात प्रचाराचे तापमान वाढले असून त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन रॅलीला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष ठरला.

शहराच्या विकासाविषयी ठोस भूमिका मांडणाऱ्या शिंदे सेनेच्या या रॅलीदरम्यान नागरिकांत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. उच्चशिक्षित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम यांच्या उपस्थितीने तर रॅलीला वेगळीच उर्जा मिळाली. युवा नेतृत्व म्हणून त्यांचे प्रचंड कौतुक होत असून नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

रॅलीदरम्यान कुणाल चोरडिया, विनोद मोहितकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम तसेच प्रभागातील सर्व उमेदवार आणि शिंदे सेनेचे मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील ठळक समस्या अधोरेखित करत शिंदे सेनेने मांडलेली विकासाभिमुख भूमिका आता प्रभागातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.प्रभाग १३ मध्ये शिंदे सेनेचा हा दमदार प्रचार पाहता आगामी निवडणुकीत समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page