Tuesday, February 17, 2026
HomeCityप्रभाग क्र.८ मध्ये शिंदे गटाचा लाडका युवा चेहरा रिंगणात राजू रिंगोले ......

प्रभाग क्र.८ मध्ये शिंदे गटाचा लाडका युवा चेहरा रिंगणात राजू रिंगोले ……

•स्नेहबंध,तरुणाईतला उत्साह आणि सर्वांना विश्वास देणारी कार्यशैली.

Ajay Kandewar, Wani :-वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून युवा, उत्साही आणि सर्वांचा लाडका चेहरा राजू रिंगोले हे आता मैदानात उतरल्यानं प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

राजू रिंगोले हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य, नागरिकांच्या समस्या, शहरातील मूलभूत सुविधांच्या अडचणी यावर सातत्याने काम करणारे नाव. प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी जुळलेला त्यांचा स्नेहबंध, तरुणाईतला उत्साह आणि सर्वांना विश्वास देणारी कार्यशैली यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा व परिसर विकास या महत्त्वाच्या मुद्यांवर इंगोले यांनी आतापासूनच आपली स्पष्ट भूमिका मांडत “प्रभागाचा सर्वांगीण विकास” हीच पहिली प्राधान्यक्रम ठरवली आहे.प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मतदार वर्ग आणि सर्वसामान्य कुटुंबांमध्ये त्यांची लोकप्रियता पाहता शिंदे गटाने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास अधिक ठळक होताना दिसतो.”लोकांची अपेक्षा …माझे वचन” या भूमिकेतून राजू रिंगोले यांनी निवडणूक लढत विकास आणि स्वच्छ प्रशासनाच्या बळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.प्रभाग क्रमांक ८ मध्ये आता चुरशीची निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत असून, शिंदे गटाचा हा कर्मशील युवा चेहरा मतदारांच्या पसंतीस उतरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments