Ajay Kandewar,Wani:- वणीच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा “दमदार चाल” खेळली आहे. प्रखर कार्यशैली, जनसंपर्काची धार आणि संघटनशक्ती पाहता सरपंच नागेश धनकसार यांची भारतीय जनता युवा मोर्चा वणी (चिखलगाव) ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज अनिलकुमार गुप्ता यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रातून धनकसार यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने वणीच्या राजकारणात नवा उत्साह संचारला असून, विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे. सरपंच नागेश धनकसार हे पक्षनिष्ठ, प्रखर संघटनकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण व पक्षविस्तार याला वेग मिळेल, अशी पक्षांतर्गत चर्चा आहे.त्यांच्या पदनियुक्तीने वणी ग्रामीण भागात भाजपच्या संघटनाला नवे बळ आणि नवे नेतृत्व लाभले.
•जिल्हाध्यक्ष सुरज गुप्ता यांचं मत…
“जिल्हाध्यक्ष सुरज गुप्ता यांनी म्हटलं आहे की, नागेश धनकसार यांच्या कार्यशैलीत पक्षनिष्ठा आणि जनहित यांचा समतोल दिसतो. त्यांच्याकडे संघटनात्मक दृष्टिकोन आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची ताकद आहे. त्यामुळे युवा मोर्चाला नवा वेग मिळेल.वणी परिसरात ही नियुक्ती “भाजपच्या नव्या इंजिनाची स्टार्टिंग” मानली जात असून, आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता ही रणनीतिक चाल भाजपसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे संकेत आहेत.”

