Saturday, April 18, 2026
HomeBreaking News"पुरण भैया" पुन्हा गुटखा विक्रीत जोमाने ॲक्टिव्ह.....

“पुरण भैया” पुन्हा गुटखा विक्रीत जोमाने ॲक्टिव्ह…..

•अधिकाऱ्यांनी टाकल्या " भैया पुढें" नाग्या. •मोठी कारवाई होत नसल्याने " पुरण" माजला.

Ajay Kandewar,Wani:- आरोग्यास हानिकारक असलेला सुगंधित तंबाखू व गुटखाबंदी तालुक्यातील एक “पुरण ” नामक व्यक्ती घरून चुटुक चुटूक माल बोलावून अती माज करीत सर्रास अवैध गुटखा विक्री करत आहे.परंतु, त्यावरही कळस म्हणजे या जीवघेण्या वस्तूची विक्री घरून वाढवण्यासाठी” पूरण भैया” ने स्कीम बक्षिसेही देऊ करत असल्याचं बोलल्या जात आहे. या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची ‘नजर’ मेल्याने गुटख्याचे अवैध विक्रेता ‘अ- पुरण’ होऊ शकत नसल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

मागील महिन्यात वणी येथे मोठ्या प्रमाणात बाजीराव , गूगल सुपारी, व mazaa डब्बे विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना त्यावर फूड विभागाने काहीतरी थातूरर्मातुर कारवाई करून त्या सिंधी कॉलनीतील “एका ” दुकानदाराला वाचण्याच्या प्रयत्नात आपली नाचक्की करून घेतली होती. परंतु आता तर मागील काही दिवसापासून एक मोठी चर्चा वगैरे झाली की “पुरण भैया “ नामक व्यक्ती हा आपल्या दुकानातून मस्त maza व गुटखा खुलेआम विकत आहे .ही बाब अतिशय हानिकारक असून मानवी जीवनाला धोकादायक ठरणारी बाब आहे .यावर संबंधित विभागाने लक्ष देणे तर सोडाच कारवाई करण्यास ही धजावत नाही कारण कारण स्पष्टरित्या त्यांचा आशिर्वाद या “पुरण भैया “तंबाखू तस्कर अती माजला आहे आणि मानवी आरोग्याचा” सत्यानाश” करण्यासाठी घरून माल दुकानात आणून विकत असल्यामुळे आता यवतमाळ विभागातील एस.पी साहेबांनी याकडे जातीने लक्ष देऊन यावर मोठी कारवाई करण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहे. या माजलेल्या “भैया ” या कारागृहाची हवा दाखवून माज उतरविणे गरजेचे आहे. अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

हाच तो गुटखा.

•अधिकाऱ्यांना दिली जाते “पुरण भैया “ मस्त मलाई भेट?

हा माजलेला”भैया” अधिकाऱ्यांना गुटखा विक्रीसाठी” मस्त मलाई “भेट देत असल्यामुळे सर्रास खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळेच प्रशासन कारवाई करीत नसल्याचेही बोलले जात आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page