सुरेंद्र इखारे,वणी :- येथून जवळच असलेल्या पुरड कृष्णानपूर् ते मोहदा मार्गावर मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खडे पडले असून सर्वसामान्य नागरिकांना मार्गभ्रमन करणे कठीण झाले असते तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभाकर्णी निद्रेत दिसून येत आहे.
तालुक्यातील कृष्णा नपुर ते पुरड हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून आतिषय खराब झाला आहे व सततच्या पावसाने चिखलमय झाला आहे मोठ मोठे खड्डे पडले असताना सुद्धा संबंधित प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मार्ग दुरुस्तीसाठी सत्तेतील राजकीय पक्षांनी देखील केले होते परंतु या आंदोलनाचे पाणी कुठं मुरले हे कळायला मार्ग नाही. लोकप्रतीनिधींनीही सातत्याने याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
कृष्नानपुर ,कुंड्रा येथील शाळकरी मुलांना ३ ते ४ की मी चा प्रवास हा पायदळ करावा लागतो ते सुद्धा चिखलमय रस्त्याने अशी अवस्था रस्त्याची झाली आहे . तरी याकडे प्रशासनाने गाभिर्याने लक्ष घालावे अशी मागणी शाळकरी मुलांनी व त्यांच्या पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश गोरे यांनी केली आहे.