•कोयत्याने पोटात घाव घालून निर्घृण हत्या.
माणिक कांबळे /मारेगाव:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा येथे काका पुतण्याचा वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन पुतण्याने काकाच्या छातीवर दगडी फाडी टाकली,लाठी पोटात खुपसली त्यानंतर,कोयत्याने पोटात घाव घालून निर्घृण खून केला ही घटना आज 30जूनच्या सकाळी 10वाजताचे सुमारास घडली.
सुभाष सभाजी पचारे (50) रा.कोसारा असे खून झालेल्या काकाचे नाव आहे. तर चंपत देविदास पचारे (33)कोसारा असे निर्घृण खून करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे.घटनेच्या वेळी काका, पुतणे दोघेही दारू प्यायले आणि त्याच्यात वाद झाला या वादाचे पर्यावसानं हाणामारीत होऊन खुणात झाले.
या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून घटना स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत आहे.त्या सोबत आरोपी पुतण्या चंपत पचारे यास घटना स्थळा वरून ताब्यात घेण्यात यश आले आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.