•”मेरे पीछे सब हैं..” म्हणत पोटभरू राजकारण वेकोली क्षेत्रात केलं सुरु.
•”चमकोगिरीच” नवीन “क्रेझ”.
अजय कंडेवार,वणी:- हल्ली ज्याला त्याला पुढारपणाचे वेड लागले आहे. शुभ्रवस्त्र परिधान केले की, काहिंना नेतेगिरीचा ‘फिल’ येतो. असाच एक आव शहरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. नव नवीन निवेदने, तक्रारी देऊन,साहेब व भैयाना सोबत दाखवित “मै हु तेरा नेता , मुझे सब आता” असे म्हणत त्याचा कार्यक्षेत्रात असो की, कार्यक्षेत्राताचा बाहेर असो तिथेही दमदार नेतेगीरी करतांना दिसत आहे.
काही दिवसापूर्वीच शहरात अशीच एक घटना घडली की, कामगारांचा मीच या जिल्ह्याचा नेता म्हणुन स्वयघोषित करून घेतले.मलाच निवड करण्यात आली म्हणून चुकीची माहिती दिली . एव्हढेच नव्हे तर अधिकृत माहीती त्याचाजवळ असतांनाहीं ” त्या” स्वयंघोषित कामगार नेत्याने तर हद्दच पार केली त्याने तर दुसऱ्या जिल्ह्यातही आपली निवड “याच जिल्ह्यात” झाली म्हणत स्वतःची एक सोशल पोस्ट बनवून घेत स्वतःच ज्या त्या समूहावर वाऱ्यासारखी पसरविली. त्या स्वयंघोषित नेत्याची माहिती घेतली असता, तो तर चक्क कामगारांनाच वेडा बनविण्यात व्यस्त असल्याचे समजले. नेमके असं करण्यामागे काही गबाड तर नसाव असा दाट काहीं वेळेसाठी दाट संशय निर्माण झाले.
पण, तो “स्वयंघोषित कामगार नेता” पांढरे शुभ्र कपडे घालून “मैं हू ना…. मेरे पीछे सब हैं ना ” म्हणत त्यांचा कार्यक्षेत्रात चांगलाच दम देत असल्याचेही विशेष चर्चा रंगू लागली….. या स्वयंघोषीताचा इतिहास तर हसण्याजोगताच आहे. “तो ” नेहमी कार्यक्षेत्र असो जन्मठिकाण असो मोठ मोठ्या नेत्याचे फोटो लावून चमकोगिरी करीता बॅनरबाजी करत असते अशी खमंग चर्चा “दोन्ही ” जिल्ह्यात ऐकावयास मिळाली. परंतु हा स्वयंघोषित नेता “चक्की”(Windmill) सारखा कार्य देखील करीतो. या”चक्कीचे ” तीन पाते कोण? त्या तीन पात्यांचे भरवश्यावर ” पोटभरू भाकर “शिजवित तर नाही ना? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.